By  
on  

शिल्पा शिंदेनंतर अभिनेत्री आसावरी जोशीही राजकारणात, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

कलाकारांची राजकिय कारकिर्द आपल्याला नवी नाही. अनेकांनी अभिनयात नाव कमावल्यावर राजकारणात यशस्वी कारकिर्द केली आहे. पण अनेकांचा हा प्रयोग फसलेलादेखील दिसून येतो. सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी आपल्या राजकिय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आहे. इशा कोप्पीकर, शिल्पा शिंदे ही नावं त्यातलीच आता आसावरी जोशी यांनीही राजकारणात एन्ट्री केली आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार आसावरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे शिल्पा शिंदेनेही काही दिवसांपुर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आसावरी जोशी यांनी अनेका हिंदी मराठी मालिका आणि सिनेमांमधून काम केलं आहे. ‘ऑफिस ऑफिस’ या हिंदी मालिकेतून त्यांना खास ओळख मिळाली. आता राजकाराणात उतरलेल्या आसावरी यांची पक्षातली भूमिका काय असेल हे लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive