By  
on  

मराठीतील या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींचा हा सेल्फी मोड पाहिलात का?

मराठीतील दोन ग्लॅमरस आणि सुपरहॉट अभिनेत्री जर एकत्र आल्या तर काय मजा ना..पण तुम्हाला यासाठी प्रतीक्षा करण्याची अजिबातच गरज नाही. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या आगामी 'पॉंडिचेरी' सिनेमानिमित्ताने अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर या दोन ग्लॅमरस अभिनेत्री एकत्र झळकतायत. अभिनेता वैभव तत्त्ववादीसुध्दा सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आयफोनवर चित्रीत होणारा पहिला मराठी सिनेमा आहे.

पॉंडिचेरी सिनेमाच्या शूटींगसाठी सिनेमाची संपूर्ण टीम सध्या पॉंडिचेरी येथे आहे. स्मार्टफोनसाठी शूटींग करणं हे दिग्दर्शकासह सिनेमातील सर्व कलाकार भरपूर एन्जॉय करतायत. शूटींग पार पडल्यानंतर फावल्या वेळेत पॉंडिचेरी शहराचा तेथील निसर्गसौंदर्याचा आणि समुद्रकिना-यांचा मनोसोक्त आस्वाद घेताना अमृता,सई व वैभव हे कलाकार आपले फोटो सोशल मिडीयावर शेअर करताना पाहायला मिळतात. असाच एक समुद्रकिना-यांवरचा अप्रतिम सेल्फी मोड अमृता आणि सईने आपल्या पॉंडिचेरीच्या आठवणींमध्ये कैद केला आहे. सूर्यकिरणांच्या साथीने या दोन सौंदर्यवती अभिनेत्रींनी काढलेला हा सेल्फी खुप जबरदस्त आहे आणि दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्येसुध्दा मैत्री असू शकते हे हा फोटो सिध्द करुन दाखवतोय.

https://www.instagram.com/p/BuStDPaBMjo/

'पॉंडिचेरी' सिनेमात सई, अमृता आणि वैभवसोबतच नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकरसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका साकरतायत. हा पहिव वहिला मराठी स्मार्टफोन सिनेमा असल्याने प्रेक्षकांसह संपूर्ण सिनेसृष्टीला सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive