By  
on  

सखी गोखले-सुव्रत जोशी अडकले विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीत लग्नाचा सीझन सुरु आहे. सध्या आणखी एक गोड कपल नुकतंच विवाहबंधनात अडकलं आहे ते म्हणजे सखी आणि सुव्रत. या दोघांचा विवाह वेषातील फोटो नुकताच व्हायरल होत आहे.

दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनिमित्त हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांनासुध्दा कळलं नाही. हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबत फिरण्याचे आणि मस्ती मूडमधले फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सुव्रतने सखीच्या एका फोटोला आय लव्ह हर, अशी कमेंट दिली होती. यावरुनच यांची रिलेशनशीप जगजाहीर झाली. आता लग्नाने त्यांच्या नात्याला खास नाव दिलं आहे. या सोहळ्यात निपुण धर्माधिकारी, दिल दोस्ती दुनियादारीची टीम तसेच पर्ण पेठे दिसून येत आहे. हिरवा शालू आणि मोती रंगाची शेरवानी घातलेल्या सखी आणि सुव्रतच्या या फोटोंना बरेच लाईक्स मिळत आहेत.

सगुणा बाग येथे मोजके मित्र-मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सखी-सुव्रतच्या लग्नमसोहळ्याची पाहा ही क्षणचित्रे :

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive