अण्णांच्या शेवंताची बॉलिवूड एन्ट्री, म्हणतेय 'सब कुशल मंगल'

By  
on  

शेवंता या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपुर्वा नेमळेकर. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे शेवंता प्रसिद्धीच्या झोतात आली. पण शेवंतामुळे अपुर्वाकडे हिंदी सिनेमात झळकण्याची संधी चालून आली आहे. शेवंता आगामी ‘सब कुशल मंगल है’ या सिनेमात दिसणार आहे. अपुर्वाने नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर करत ही बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने रिवा किशन म्हणजेच रवीकिशनच्या मुलीलाही टॅग केलं आहे. कदाचित रिवादेखील या सिनेमाचा भाग असू शकेल.

https://www.instagram.com/p/BwTx5qdnywl/?utm_source=ig_web_copy_link

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवताना दिसत आहे. खरं तर हा भाग मूळ मालिकेचा सिक्वेल नसून प्रिक्वेल आहे. यात नाईकांच्या वाड्यातील पूर्वार्ध दाखवला जात आहे. शेवंताच्या प्रवेशानंतर मालिकेतील उत्कंठेत वाढ झाली आहे.

Recommended

Loading...
Share