By  
on  

‘तुला पाहते रे’मध्ये ज्युनिअर सुबोध भावेची एंट्री, दिसणार या व्यक्तिरेखेत

‘तुला पाहते रे’ या मालिकेने आता रंजक वळण घेतलं आहे. या मालिकेत आता विक्रांत आणि राजनंदिनीचा प्रवास दाखवला जाणार आहे. यामध्ये लहानपणीच्या जयदीपची व्यक्तिरेखा एक खास पाहुणा कलाकार साकारणार आहे त्याचं नाव आहे मल्हार भावे.

मल्हारने यापुर्वीही सुबोधसोबत ‘फुगे’ सिनेमात काम केलं होतं. त्यामुळे कॅमेराला सामोरं जाणं त्याच्यासाठी नवीन नाही. यात तो सुबोधच्या लहानपणीच्या भूमिकेत दिसला होता. आता ‘तुला पाहते रे’ यामध्ये जयदिपची व्यक्तिरेखा तो कसा साकारतो याची उत्सुकता रसिकांना असेल. तुला पाहते रेमध्ये आता बहुप्रतिक्षित अशी राजनंदिनीची एंट्री झाली आहे. आता तिचा मृत्यू नक्की कसा झाला आणि त्याचा इशाशी काय संबंध आहे याचा उलगडा लवकरच रसिकांसमोर होणार आहे.

https://www.instagram.com/p/Boo6pyghj1H/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive