By  
on  

पाहा 'रंपाट'मधील अभिनेता अभिजित चव्हाणचा हा हटके लुक

रवी जाधवचा आगामी सिनेमा 'रंपाट'ची सिनेवर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात अभिनेता अभिजित चव्हाण काम करत असून अभिजित चव्हाणचा या सिनेमातील हटके लुक प्रसिद्ध झाला आहे,

'घेऊन मारुतीची आन,सिनेमाच्या विरोधात आखाड्यात उतरलाय पांडबा पैलवान! आपल्या मुन्नीचा हानिकारक बापू!' अशा वाक्यात अभिजीतच्या भूमिकेचं वर्णन करण्यात आलं आहे. अभिजीतने यापूर्वी अनेक मालिका,सिनेमे आणि नाटकांमधून स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.अभिजीतची 'स्ट्रगलर साला' ही वेबसिरीज ऑनलाईन विश्वात खूप लोकप्रिय आहे.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला 'रंपाट' हा सिनेमा १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अभिनय बेर्डे आणि कशमीरा परदेशी ही फ्रेश जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive