धार्मिक मालिकांमध्ये आजही ‘जय मल्हार’ मालिकेचं स्थान सगळ्यात वरचं आहे. या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे आता वेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येणार आहे. देवदत्त अजय देवगणच्या ‘तानाजी द अनसंग ‘ वॉरिअर मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्तने नुकतीच ही माहिती रसिकांपर्यंत पोहोचवली आहे. या सिनेमात त्याची भूमिका काय आहे हे कळू शकलेलं. तरीही ब-याच दिवसांनी चाहते त्याला एका दमदार भूमिकेत पाहू इच्छितात.
मुळच्या अलिबागचा असलेला देवदत्त सर्वप्रथम ‘देवयानी’ मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी त्याचा रांगडा अभिनय रसिकांना आवड्ला होता. ‘जय मल्हार’ मालिकेने मात्र त्याचा करीअर ट्रॅकच बदलला. या मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेने त्याला महाराष्ट्राच्या घराघरात नेऊन पोहोचवलं. दमदार व्यक्तिमत्त्व, करारी चेहरा आणि उत्तम अभिनय यामुळे त्याने साकारलेल्या खंडोबा या व्यक्तिरेखेला रसिकांनी आपलंसं केलं. ही मालिका संपल्यानंतर त्याने सिनेमाकडे मोर्चा वळवला.
तो जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याने पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. या सिनेमालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बरेच दिवस देवदत्तचं पडद्यावर दर्शन न झाल्याने चाह्त्यांना त्याच्या आगामी सिनेमाबद्दल उत्सुकता होती. पण देवदत्तने तो स्वत:चं अजय सोबत काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या सिनेमात अजय आणि देवदत्तसोबत सैफ अली खान, काजोलही झळकणार असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा १० जानेवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.