By  
on  

सलमानची आई झालेली सोनाली प्रत्यक्ष जीवनात त्याच्यापेक्षा आहे इतकी लहान

सोनाली कुलकर्णी हरहुन्नरी अभिनेत्री आहे. कोणतीही भूमिका सोनाली समरसून जगते. गुलाबजाम', 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'माधुरी' या सिनेमांमधून तिने वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' सिनेमात सोनाली कुलकर्णी महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. एका प्रथितयश मिडिया हाऊसला मुलाखत देताना तिने या व्यक्तिरेखेविषयी भावना व्यक्त केल्या. सोनाली यावेळी म्हणते की, भूमिका कोणती आहे हे महत्त्वाचं नाही तर विविधतेने साकारता येईल याकडे माझा कटाक्ष असतो.


 

 

सोनालीने या सिनेमात सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. खरं पाहता सोनाली सलमानप्रेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. पण सलमानच्या आईची भूमिका तिने सक्षमपणे साकारली आहे. सोनालीने मिशन काश्मीर या सिनेमातही हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे सोनालीसमोर भूमिका कुणाची आहे यापेक्षा ती किती प्रभावीपणे साकारता येईल याचं ध्येय असतं हेच दिसून येतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive