By  
on  

हे आहेत मराठी सिनेसृष्टीतील सुपरकुल डॅडी, पाहा कोण कोण आहे या यादीत 

 'फादर्स डे' म्हटलं की प्रत्येकाजवळ बाबांची काहीना काही सुरेख आठवण असतेच. मराठी कलाकारही 'फादर्स डे'चं सेलिब्रेशन करण्यासाठी अजिबात मागे हटत नाही. मराठी सिनेसृष्टीतील काही बापमाणसांनी मुलांसोबत तर काही मुलांनी सुपरकूल वडिलांसोबत शेअर केलेले फोटो आपण पाहू.

आदिनाथ कोठारे : सुपरकूल बाबांच्या यादीत हे नाव सगळ्यात अग्रस्थानी आहे. आदिनाथ ‘जिजा’ नावाच्या गोड लेकीचा बाप आहे. पडद्यावर व्हिलनशी हाणामारी करणारा आदिनाथ जिजासोबत असताना जणू तिच्याइतकाच लहान बनतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Guess who turned #1 today ? ...obviously the #father ! :^D ️ #cakesmash #birthdaygirl #jizahkothare

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

स्वप्नील जोशी: पडद्यावर रोमॅंटिक अदांनी नायिकेला भुलवणारा स्वप्नील घरी मात्र राघव आणि मायराच्या लीलांमध्ये रमतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#sunday Maayra & Baba.

A post shared by Swwapnil Joshi App Now Live! (@swwapnil_joshi) on

 

सिद्धार्थ जाधव : ‘स्वरा आणि इरा या माझ्या लेकी माझं आयुष्य आहेत’. असं सिद्धार्थ नेहमी म्हणत असतो. लेकींसोबतचे अनेक फोटो तो सोशल मिडियावरती देखील शेअर करत असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Checkmate....♟ #irajadhav #बापलेकीचीमज्जा... #siddhumoments #familytime

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

श्रेयस तळपदे: सरोगसीने बाबा बनलेला श्रेयस लेक आद्याचा सगळ्यात लाडका आहे. श्रेयसला कायमच आद्यसारखी गोड लेक हवी होती. तिच्या येण्याने श्रेयसची इच्छा पुर्ण झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cannot wait to get back to you my love. See you next week. Time for Daddy to get back to work.

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

 

रितेश देशमुख : क्युट कपल असणारे रितेश आणि जिनिलियाच्या मुलांचं नाव रिआन आणि राहिल आहे. रितेश कूल अभिनेता आहेच पण कूल डॅडीपण आहे हे त्याच्या सोशल मिडियावरील फोटोंमधून दिसून येतं. 

पुष्कर जोग : पडद्यावर हिरॉईनचं क्रश असलेला पुष्करचं क्रश मात्र त्याची  लेक फेलिशा आहे. पुष्करची लेक त्याला भेटायला ‘बिग बॉस’च्या घरातही आली होती. त्यावेळी क्युटनेसने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं.

 

सुबोध भावे : पडद्यावर अदाकारीने भुरळ पाडणा-या सुबोध भावेला कान्हा आणि मल्हार नावाची मुलं आहेत. त्यापैकी मल्हारने वडिलांच्या हातावर हात मारत अगदी लहानवयातच अभिनयाची चुणुक दाखवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सुट्टीचे हावभाव

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

अंकुश चौधरी: अंकुश चौधरीच्या मुलाचं नाव 'प्रिन्स' असं असून अंकुश आपल्या लाडक्या मुलासोबत धमाल करताना दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#पाऊस #rain #Prince

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive