Photos : अमृता खानविलकरची गर्ल गॅंगसोबत मालदीवमध्ये धम्माल

By  
on  

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमधे स्वतःच्या अभिनयाने छाप पडणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता सध्या मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेतोय. 

अमृता सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून तिच्यासोबत तिची आई आणि तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री सोनाली खरे सुद्धा असलेली दिसून येत आहे. 

निळ्याशार समुद्रात व्हाईट गाऊनमध्ये अमृता जणू जलपरी भासत आहे. 

अमृता आणि सोनाली या खूप चांगल्या मैत्रिणी असून मालदीवमध्ये विमानांत या दोघी धमाल करताना दिसत आहेत. 

समुद्री विमानासमोर अमृताने एक मस्त फोटो काढल्यामुळे तिचा एकदम रिलॅक्स मूड असलेला दिसून येतो. 

अमृताने गेल्या वर्षी 'राझी', 'सत्यमेव जयते' यांसारख्या सिनेमात अभिनय केला असून 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी सिनेमात तिने साकारलेली छोटीशी भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. लवकरच अमृता 'पॉंडिचेरी' या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share