By  
on  

हॉकीनंतर अभिनेत्री सागरिका घाटगे आता खेळणार 'फुटबॉल'

अभिनेत्री सागरिका घाटगेने 'चक दे इंडिया' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'रश', 'फॉक्स', 'इरादा', 'दिलदरिया' यांसारख्या हिंदी सिनेमांतुन स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. सागरिकाने 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमातून सुद्धा अभिनयाची छाप पाडली. 

'चक दे इंडिया' या पहिल्याच सिनेमातून हॉकी प्लेयरची दमदार भूमिका साकारल्यानंतर सागरिका आपल्या आगामी सिनेमातून फुटबॉल प्लेयरची भूमिका साकारणार आहे. 

'मान्सून फुटबॉल' असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हिरवी साडी नेसलेली, कपाळावर टिकली असलेली आणि फुटबॉलसह उभी असलेली एक हटके पोझ सागरिकाने दिली आहे. 

‘मान्सून फुटबॉल’ सिनेमात असलेल्या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीला कंटाळलेल्या असतात. या सर्व महिला एकत्र येऊन रोजचा दिनक्रम मोडून फुटबॉल त्यांचं पॅशन कसं बनतं  हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

‘मान्सून फुटबॉल’ च्या माध्यमातून आणखी एक सशक्त स्त्री कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिलिंद उके हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून सागरिका घाटगेसह विद्या माळवदे, चित्राशी रावत, प्रितम कागणे आणि सीमा आझमी या अभिनेत्रींच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive