मराठी सिनेमा त्यांच्या दर्जेदार मांडणीमुळे कायमच रसिकांच्या मनात स्थान मिळवत आहेत. बॉलिवूडलाही मराठी सिनेमांचा मोह पडताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडकरांनी अभिनेता किंवा निर्माता म्हणून मराठी सिनेमात काम केलं आहे. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे, ते नाव म्हणजे संजय दत्त. संजय दत्त आता मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे.
Dedicating our first Marathi film “BABA” to the person who remained steadfast in my life through everything! Love you Dad.#BabaOn2Aug - produced under the banner of @SanjayDuttsProd & @bluemustangcs
Directed By: @RAjRGupta2 pic.twitter.com/Ktg9fPQ1DQ— Sanjay Dutt (@duttsanjay) June 18, 2019
‘बाबा’ असं नाव असलेल्या सिनेमाची निर्मिती संजयची ‘संजय दत्त प्रोडक्शन’ ही संस्था करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात एक मराठमोळा अभिनेताही झळकणार आहे. या सिनेमात सगळ्यांचा लाडका गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकर झळकणार आहे. त्याने अलीकडेच यासंबधी सोशल मिडियावर जाहीर केलं होतं. राज गुप्ता हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
. या सिनेमाचं मोशन पोस्टर देखील नुकतंच लाँच केलं गेलं आहे. यामध्ये एक मुलगा वडिलांच्या मागे सायकलवर बसून जाताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहे-यावरील आनंद लपत नाहीये. संजयनेही सोशल मिडियावर या सिनेमाची माहिती दिली. संजय म्हणतो, ‘माझ्या पहिल्या मराठी सिनेमाचं नाव बाबा असून हा सिनेमा मी माझ्या वडिलांना समर्पित करतो आहे.’ हा सिनेमा २ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे.