मुंबईत आज सकाळपासून जोरात पाऊस बरसत आहे. या पावसामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. कोणी पावसावर कविता लिहून, कोणी चिंब भिजलेला फोटो पोस्ट करून या पावसाचा आनंद लुटत आहे.
यात मराठी सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. नुकतंच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमधील हे त्रिकुट सेटवर पहिल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. गुरुनाथ अर्थात अभिनेता अभिजीत खांडकेकरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'पाऊस आला' असं कॅप्शन त्याने या व्हिडिओखाली लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीतसोबत शनाया हे पात्र साकारणारी इशा केसकर आणि सर्वांचा लाडका केडी म्हणजे अभिजीत गुरु हे कलाकार धमाल करताना दिसत आहेत.
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.