स्वानंदी बेर्डे ही तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या फोटोंची, आणि तिच्या स्टायलिस्ट लुक्सची मराठी सिनेविश्वात नेहमी चर्चा सुरु असते.
नुकतंच स्वानंदीने तिच्या पाठीवर एक टॅटू गोंदवून घेतला आहे. या टॅटू तिने वडील आणि मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील दिवंगत दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या टोपणनावाने रेखाटला आहे. लक्ष्मीकांत यांना 'लक्ष्या' या टोपणनावाने सर्वजण ओळखायचे. स्वानंदीने आपल्या बाबांचं हे लाडकं नाव टॅटूच्या स्वरूपात गोंदवून घेतलं आहे.
आपले वडील, आई आणि भाऊ अभिनय बेर्डेच्या पावलावर पाऊल टाकत स्वानंदीसुद्धा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे.