सुबोध भावे झळकणार सुभाष घईंच्या ‘विजेता’ सिनेमात

By  
on  

सुभाष घई हे नाव आपल्याला हिंदी सिनेमांच्याबाबतीत माहीत आहे. पण फारच थोडे लोक जाणतात की, त्यांनी अनेक उत्तम मराठी सिनेमेही निर्मित केले आहेत. सुभाष घई यांनी त्यांच्या ,मुक्ता आर्टस् लि.तर्फ सनई चौघडे वळू आणि समिता या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. संंहिता या चित्रपटाला तर राष्टीय पुरस्कारही मिळालेला होता.  

सुभाष घई आता आणखी एक मराठी सिनेमात बनवणार आहेत. या सिनेमात सुबोध भावे मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘विजेता’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची घोषणा सुभाष घईंनी नुकतीच गोवा आंतरराष्टीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये केली. या चित्रपटाचं प्रथम पोस्टर लाँचिंगचे अनावरण गोव्याचे सांस्कृतिक आणि कला मंत्री  गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सिनेमा खेळावर बेतला असल्याचं दिसून येत आहे. येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षीच्या चोवीस जानेवारीला तो प्रदर्शित करण्याचा सुभाष घईंचा विचार आहे. सुबोध शिवाय या सिनेमात पुजा सावंत, नेहा महाजन यांच्या भूमिका आहेत.

 

‘सनई चौघडे’नंतर सुबोध आणि सुभाष घई या सिनेमासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये अ‍ॅथलॅटिक्स, सायकलिंग आणि बॉक्सिंग हे खेळ दिसत आहेत. ‘My Sports: My Soil: My Magic’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. अमोल शेटगे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. .निर्माते राहुल पुरी ,सहनिर्माते सुरेश पै ,छायालेखक उदयसिंह मोहिते संगीत रोहन रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत.

या चित्रपटाचं प्राँडक्शन डिझायनर सुनिल निगवेकर असून जाहिरात संकल्पना साकेत शिकांत यांची आहे.या चित्रपटाचे पी आर ओ प्रद्ना शेट्टी आणि प्रेम झिंगनानी हे आहेत.तर सहाय्यक दिग्दर्शक महेश पावसकर हे आहेत.

Recommended

Loading...
Share