झोकात पार पडलं ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेचं लग्न

By  
on  

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे वाग्दत्त वधूसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अंकुर 28 जून रोजी लग्नाच्या बंधनात बांधला गेला. यवतमाळमधील कोर्टात अंकुरचा विवाह पार पडला. तर पुसद या त्याच्या गावी स्वागत समारंभ पार पडला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जे सगळ्यांच होत तेच झालं माझं विवाह संपन्न

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official) on

 

सोशल मिडियावर लग्न आणि स्वागत समारंभातील फोटो शेअर करत त्याने लग्नाची कबुली दिली आहे. या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘ जे सगळ्यांच होत तेच झालं माझं, विवाह संपन्न’.

अंकुरचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. त्याचे फोटोही त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ‘

चला हवा येऊ द्या’मधील छोटूच्या भूमिकेपासून अंकुरला प्रसिद्धा मिळाली आहे. विशेषत: त्याने अलीकडेच साकारलेली इशाची व्यक्तिरेखा रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली होती.

Recommended

Loading...
Share