दिग्गज गायिका आशा भोसले यांचा स्वरसाज असलेलं हे नवं गाणं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल

By  
on  

संगीत आणि गायन क्षेत्रात आशा भोसले यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. आशा भोसले यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. वयाच्या ८६व्या वर्षीही आशाताईंचा उत्साह आणि काम करण्याची एनर्जी वाखाणण्याजोगी अशीच आहे. 

आशा भोसले यांनी आजवर अनेक भाषांमध्ये स्वतःच्या गायनाची जादू पसरवली आहे. शास्त्रीय, सुगम, लोकगीत, कॅब्रे असो वा सुफी आदी  संगीतातील असंख्य प्रकार आशाताईंनी आपल्या गायनाने सजवले आहेत.

आशाताईंच्या गायकीतील हीच खासियत असलेली अदा संगीत रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. आशाताईंनी आपल्या अनोख्या गायनशैलीने ‘व्हॉट्सॲप लव्ह’ ह्या मराठी सिनेमासाठी एक क्लब साँग गायले आहे.

 

अजिता काळे आणि साहील सुल्तानपुरी यांची गीतरचना असलेलं ‘रात सुहानी सी…झाले दिवानी मी’ या गाण्याला आशाताईंनी स्वरसाज चढवला आहे. हे गाणं राकेश बापट आणि पल्लवी शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. विठ्ठल पाटील यांचे नृत्यदिग्दर्शन आणि ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कलात्मकदृष्टीतून साकारलेले हे गाणं पडद्यावर पाहणं एक विलक्षण अनुभव असणार आहे. या गाण्याच्या निमित्ताने आशाताईंचा 

प्रेमसंबंधातील हळव्या भावनांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी असलेला 'एच एम जी एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'जम्पिंग टोमॅटो' प्रस्तुत 'व्हॉट्सॲप लव्ह' हा रोमॅंटीक म्युझिकल सिनेमा १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  

 

 

Recommended

Loading...
Share