By  
on  

श्रेयस तळपदेच्या पत्नीसोबत घडला हा प्रकार, ट्वीट करून केलं शेअर

श्रेयस तळपदेने अलीकडेच ट्वीट करून चाहत्यांना एक विनंती केली आहे. त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या नावे फेक अकाउंट चालवलं जात आहे. विशेष म्हणजे हे फेक अकाउंट दीप्तीच्या नावाने आहेच. पण या व्यक्तीचं पद अ‍ॅमेझॉन कास्टींग हेड असल्याचंही या प्रोफाईलवर लिहिलं आहे. याशिवाय श्रेयस आणि दीप्तीचा फोटोही या अकाउंट्च्या प्रोफाईल फोटोच्या जागी आहे.

 

श्रेयसच्या हे लक्षात आल्यावर त्याने ट्वीटकरून चाह्त्यांना या फेक अकाउंट पासून लांब राहण्याची विनंती केली आहे. याबद्दल बोलताना श्रेयस म्हणतो, आमच्या मित्राने आम्हाला हा स्क्रीनशॉट पाठवला आहे. त्यावेळी आम्हीही चकित झालो. मी चाहत्यांना सांगू इच्छितो की, दीप्ती एक स्वतंत्र निर्माती आहे. तिने अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती केली आहे. ती अमेझॉनची कास्टींग डायरेक्टर नाही. त्यामुळे अशा नावाच्या फेक व्यक्तींना थारा देऊ नये.’

Recommended

PeepingMoon Exclusive