मराठीमध्ये कवी आणि गीतकारांची एक समृद्ध परंपरा आहे. मनातल्या भावना कागदावर उतरवणं आणि ते वाचकांना भिडणं सर्वात अवघड काम आहे. परंतु तरुणाईचा आघाडीचा कवी आणि गीतकार गुरु ठाकूरने काव्यलेखनाच्या अनोख्या शैलीने अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली. एका दर्जेदार गीतकारासोबत गुरूला एक उत्तम फोटोग्राफर आणि चित्रकार सुद्धा आहे.
कवी आणि गीतलेखनासोबत गुरूने काही मराठी सिनेमांमध्ये अभिनय सुद्धा केला आहे. 'नटरंग' मधील गुरु ठाकूरने साकारलेली पाटील ही छोटी भूमिका गाजली होती. मराठीसोबत हिंदीमध्ये काव्यलेखन करण्यात गुरुची खासियत आहे. पाहा, गुरु ठाकूरने लिहिलेल्या हृदयस्पर्शी कविता आणि चारोळी.