‘कोण होणार करोडपती’साठी नागराज मंजुळेचं इतकं आहे मानधन

By  
on  

नागराज मंजुळे एक उत्तम दिग्दर्शक आहेत हे सिद्ध करण्यासाठी समीक्षकाची गरज नाही. त्याचप्रमाणे ते एक उत्तम होस्ट देखील आहेत. त्यामुळेच सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’साठी सुत्रसंचालनाची धुरा त्यांच्या हातात आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या सुत्रांनी दिलेल्या माहिनीनुसार या सीझनसाठी नागराज यांना दोन कोटी इतकं मानधन मिळालं आहे. हा सीझन जवळपास 45 भागांचा आहे. पण याबद्दल अजुन निश्चित वृत्त समोर आलेलं नाही.

नागराज सध्या त्याच्या ‘झुंड’ या सिनेमात व्यस्त आहे. या सिनेमात बिग बी झळकणार आहेत. फुटबॉल प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमठ आणि नागराज मंजुळे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. नागराज यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share