'तुला पाहते रे' मधली इशा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार या नाटकातून रंगभूमीवर करणार पदार्पण

By  
on  

'तुला पाहते रे' या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या लोकप्रिय मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे इशा. इशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री दातारला पहिल्याच मालिकेतून जबरदस्त फॅन फॉलोईंग मिळाले. 

या मालिकेनंतर अभिनेत्री गायत्री दातार कोणत्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची सर्वांना उत्सुकता होती. तर गायत्रीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. गायत्री एका मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अलबत्त्या गलबत्या' या मराठी रंगभूमीवरील सध्या गाजत असलेल्या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे एक नवं बालनाट्य नाट्यरसिकांसाठी आणत आहेत. 

राहुल भंडारे आपल्या 'अद्वैत थिएटर्स'तर्फे रत्नाकर मतकरी लिखित 'निम्मा शिम्मा राक्षस' हे नाटक घेऊन येत आहेत. चिन्मय मांडलेकर या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. हे नाटक म्युझिकल असून यातील तीन गाणी स्वतः चिन्मय मांडलेकरने लिहिली आहेत. गायत्री या नाटकात शेहजादीची मुख्य भूमिका साकारणार आहे. 

तसेच या नाटकात गायत्रीसह अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे कलाकार सुद्धा असणार आहेत. या नाटकाद्वारे गायत्री व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. गायत्रीची ही नवी इनिंग प्रेक्षकांना आवडणार का, हे लवकरच कळून येईल. 

v

Recommended

Loading...
Share