By  
on  

पाहा Photos: गायक-संगीतकार अवधूत गुप्ते घेतोय सुट्टयांचा मनोसोक्त आनंद

मराठीतला आघाडीचा संगीतकार अवधूत गुप्तेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अवधूतने आगामी 'येरे येरे पैसे 2' सिनेमात 'अश्विनी ये ना...' हे नव्या अंदाजात गायलेलं गाणं सध्या प्रचंड लोकप्रिय आहे.

हा लाडका गायक सध्या दमण येथे छोट्या सुट्टीवर गेला आहे. अवधूतने स्वतःच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दमण येथील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अवधूत दमणच्या रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. अवधूत दमणला एकटाच गेला आहे की सोबत कोणीतरी आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

'पूर्वनियोजित नसलेली सुट्टी' असं कॅप्शन अवधूतने या फोटोखाली लिहिलं आहे. 

अवधूत गुप्तेने नुकतंच 'सूर नवा ध्यास नवा'च्या दुसऱ्या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत दिसून आला. अवधूतच्या खुमासदार परीक्षणाने छोट्या सुरवीरांसह प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive