By  
on  

Video: 'गर्लफ्रेंड' मधलं स्पॅनिश भाषेची गंमत असलेलं नवं गाणं ऐकाच!

मराठी सिनेवर्तुळात सध्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाची चर्चा आहे. हटके विषय, अमेय-सईची नवी जोडी, आगळीवेगळी गाणी यामुळे या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच या सिनेमातलं 'केरीदा केरीदो' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

स्पॅनिश भाषेत 'केरीदा' म्हणजे प्रिये आणि 'केरीदो' म्हणजे प्रिय. अशाच स्पॅनिश शब्दांची अनोखी गम्मत असलेलं हे गाणं वेगळं गाणं आहे. या गाण्याचा व्हिडिओ आला असून गायिका शाल्मली खोलगडे आणि गायक जसराज जोशी यांनी हे धमाकेदार गाणं गायलं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये या सिनेमातील कॅमेरामागे कलाकारांनी केलेली मजा पाहायला मिळत आहे. 

 

'गर्लफ्रेंड' या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यांच्यासह या सिनेमात इशा केसकर, रसिक सुनील, उदय नेने, कविता मेढेकर, सागर देशमुख आदी कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा २६ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive