'लागिरं झालं जी' मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सर्व पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकेतील सर्वात भाव खाऊन गेलेले पात्र म्हणजे शीतल अर्थात सर्वांची लाडकी शीतली.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने अभिनेत्री शिवानी बावकरने शीतलीचं बिनधास्त पात्र मस्त रंगवलं.
शिवानी ही उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय ती जर्मन भाषातज्ज्ञ सुद्धा आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी शिवानीने एका आय.टी. फर्ममध्ये जर्मन भाषातज्ञ म्हणून काम केले आहे.
तसेच शिवानीने योगा प्रक्षिशक म्हणूनही काम केले आहे.
शिवानीने 'अनामिका', 'सुंदर माझं घर', 'देवयानी' यांसारख्या मालिकांमध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
तसेच 'उंडगा', 'दगडाबाईची चाळ', 'यूथफूल', यांसारख्या सिनेमांमध्ये शिवानीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
'दगडाबाईची चाळ' या सिनेमातील भूमिकेसाठी शिवानीला 'सिल्वर स्क्रीन' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शिवानी लवकरच 'झी मराठी'वरील 'अल्टी पल्टी' या मालिकेमधून झळकणार आहे.