बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे रेशम टिपणीस. राजेश शृंगारपुरेसोबतच्या नात्यामुळे रेशम चर्चेत आली होती.
यावरून शोमध्ये महेश मांजरेकरांनी तिला चांगलंच खडसावलं होतं. पण रेशम या शोमध्ये येण्याआधीपासून संदेश किर्तीकर नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे.
रेशमने हे नातं आतापर्यंत जाहीर केलेलं नाहीये. रेशम आणि संदेश एकमेकांना गेली अडीच वर्ष ओळखत आहेत.
रेशमने यापूर्वी संजीव सेठ या अभिनेत्याशी लग्न केलं होतं. पण 11 वर्षांनंतर ते विभक्त झाले.
रेशम आता मानव आणि रिशिका या मुलांची सिंगल मदर आहे.
संदेशच्या इन्स्टा अकाउंटवरही त्याचे आणि रेशमचे अनेक फोटो पहायला मिळतात.