By  
on  

मराठमोळी अभिनेत्री अमृता संत जाॅन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' मध्ये झळकणार

अमृता खानविलकरपासुन सई ताम्हणकरपर्यंत मराठीच्या आघाडीच्या अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीत गाजवताना दिसत आहेत. यात आता मराठमोळी अमृता संत या अभिनेत्रीचं नाव समाविष्ट झालं आहे. जाॅन अब्राहमच्या बहुचर्चित 'बाटला हाऊस' सिनेमात अमृता एका विशेष भुमिकेत झळकणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Sant (@santamruta) on

'बाटला हाऊस' या सिनेमात अमृता एका महिला कार्यकर्त्याच्या भुमिकेत दिसणार आहे. ही महिला कार्यकर्ता भ्रष्ट पोलीस आणि सरकारी यंत्रणेविरुद्ध आवाज उठवते. या सिनेमात सुपरस्टार जाॅन अब्राहम आणि अभिनेत्री मृणाल ठाकुरबरोबर काम करण्याबाबत अमृता म्हणाली,"जाॅनला मी व्यक्तिशः ओळखत नव्हते. पण तो अत्यंत शांत, नम्र आणि चांगला व्यक्ती आहे. मृणालदेखील मनमिळाऊ असुन मदतीला कायम तत्पर असते."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Sant (@santamruta) on

अमृताने याआधी अनेक अभिनेता धनुष बरोबर 'द एक्सट्राऑर्डीनरी जर्नी ऑफ फकीर' या आंतरराष्ट्रीय सिनेमात महत्वपुर्ण भुमिका साकारली होती. तसेच नागेश भोसले दिग्दर्शित 'पन्हाळा' या मराठी सिनेमातील भुमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

At the trailer launch of The extraordinary journey of a fakir!

A post shared by Amruta Sant (@santamruta) on

Recommended

PeepingMoon Exclusive