By  
on  

ईशा केसकर बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनासोबत दिसली ‘Cozy mood’ मध्ये

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचे फॅन कायमच उत्सुक असतात. अलीकडेच त्यांच्या नात्याला दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने इशाने स्पेशल पोस्ट शेअर करत ऋषीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

या दोघांनी सोशल मिडियावर त्यांचं नातं कधीच लपवलेलं नाही. एकमेकांसोबतचे क्युट फोटो ते नेहमी शेअर करत असतात. ऋषी सक्सेना ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता. तर ईशा ‘जय मल्हार’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Since you have been around, I smile a lot more than I used to...! #ishakeskar #rishisaxena #actors #love

A post shared by Isha Chaitanya Keskar (@isha_keskar) on

 

या पोस्टला कॅप्शन देताना ईशा म्हणते, ‘दोन वर्षांपूर्वी याच दिवशी या मुलाने मला डेट करायचं नक्की केलं होतं. ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकते याची वाट प्रेक्षक पहात असले तरी ईशाने मात्र सध्या याबद्दल काहीच सांगितलं नाहीये. सध्या ईशा 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. ती ‘गर्लफ्रेंड’ सिनेमात दिसली होती. तर ऋषी देखील अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसत असतो.

 

Recommended

PeepingMoon Exclusive