By  
on  

सोनाली कुलकर्णीने तिचा नवा लूक केला चाहत्यांशी शेअर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही दिवसंपूर्वी लंडन दौ-यावर होती. तिच्या लंडनमधील तेथील फोटोंवर नेटिझन्सनी लाईक्सचा पाऊसही पाडला होता. लंडन व्हेकेशननंतर मात्र सोनाली एक्सपेरिमेंटच्या मूडमध्ये दिसत आहे. नुकताच तिने तिचा हटके लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे. नव्या लूकमधील फोटोमध्ये सोनाली मिनिमल मेकअप केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

How about a #selfie for a change! #shorthair #firstselfieinayear #haircut #notaselfiegirl #noselfieplease

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

सोनालीने यावेळी तिच्या केसांसोबत नवं एक्सपेरिमेंट केलं आहे. सोनालीने तिचे लांब केस कापून शॉर्ट केले आहेत. या शॉर्ट केसांची तिने हाय पोनी बांधली असली तरी केसांची लांबी बरीच कमी केल्याचं लक्षात येत आहे. पिंक चेक्स टॉपमध्ये सोनाली खुपच गोड दिसत आहे. यापूर्वी सोनालीने ‘हंपी’ सिनेमात हटके हेअर स्टाईल ट्राय केली होती. सोनाली अलीकडेच ‘ती आणि ती’ सिनेमात दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive