By  
on  

अभिनेता सचित पाटील परेश रावलचं हे गाजलेलं नाटक घेऊन येतोय मराठी रंगभूमीवर

अभिनेता सचित पाटील 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतून नुकतंच झळकला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सचित पाटील कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर सचित पाटीलने नुकतंच स्वतःच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेयर करून आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. 

सचित मालिका वा सिनेमा नव्हे तर नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'महारथी' हे या नाटकाचं नाव असून परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेल्या मूळ नाटकावर आधारित आहे. या नाटकाबद्दल अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसली तरी लवकरच हे नाटक रंगभूमीवर येण्याची शक्यता आहे. 

 

सचित पाटील हा मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता याआधी 'फ्रेंड्स', 'क्लासमेट्स', 'क्षणभर विश्रांती' या सिनेमांमधून झळकला होता. तसेच 'साडे माडे तीन', 'क्षणभर विश्रांती' यांसारख्या सिनेमांच्या दिग्दर्शनाही धुरा सचित पाटीलने सांभाळी होती. 

Recommended

PeepingMoon Exclusive