अभिनेता कुशल बद्रिकेने नागरिकांना केले पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन

By  
on  

सांगली-कोल्हापूर शहरात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. या भागात पूरग्रस्त परिस्थिती ओढवली आहे. आजवर अनेक लोकांनी या पुरात स्वतःचा प्राण गमावला आहे. या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांसाठी देशभरातील नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे सरसावला आहे. यातच अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करण्याचं कळकळीचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना केलं आहे. #marathikalakarwithmaharashtra हा हॅशटॅग वापरून स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कलाकारांनी 'आम्ही तुमच्यासोबत आहेत' असा दिलासा सांगली आणि कोल्हापूरकरांना दिला आहे. 

यानिमित्त कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नागरिकांनी मदत केल्याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले. सर्वांनी केलेली मदत योग्य रित्या पोहोचली आहे. तसेच पुढचा एक महिना पुरग्रस्त भागात अन्न धान्याचा मुबलक साठा असेल, असंही कुशल म्हणाला. 

यानंतर कुशलने सर्वांना अन्न धान्याव्यतिरिक्त इतर गोष्टीबनच्या मदतीचे आवाहन केले आहे. त्यामध्ये झाडू, खराटा, गमबूट आदी वस्तूंची मागणी कुशलने केली आहे. यावरुनच पुरग्रस्त परिस्थितीत मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार पुढे सरसावले आहेत, हे पाहायला मिळत आहे. 

Recommended

Loading...
Share