अमेय वाघचे चाहते आहात? तर ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल

By  
on  

सध्या सगळीकडे प्रदर्शित होणाऱ्या 'सेक्रेड गेम्स 2'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे या दोघांमधल्या थरारक खेळाची रंजकता पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार आहे. 

'सेक्रेड गेम्स 2' मध्ये काही मराठी कलाकार सुद्धा झळकणार आहेत. अभिनेत्री अमृता सुभाष हे त्यापैकीच एक नाव. यानंतर आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे तरुणाईचा लाडका अभिनेता अमेय वाघ.'सेक्रेड गेम्स' ही अमेयच्या आवडत्या वेबसिरीजपैकी एक आहे. त्यामुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागात छोटीशी तरीही महत्वपूर्ण भूमिका साकारायला मिळाल्याने अमेय भलताच खुश झाला आहे. 

 

अमेयला सेक्रेड गेम्सच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर अमेयने ऑडिशन देऊन त्याची 'सेक्रेड गेम्स 2'निवड झाली. अमेयचा ट्रॅक'मसान' फेम नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केला आहे. अमेय नेमकी कोणती भूमिका साकारतोय हे अद्याप गुलदस्तात असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही भूमिका अमेय साकारत असलेली भूमिका खलनायकी धाटणीची असणार आहे. 

नेहमी लव्हेबल भूमिकेत दिसणारा अमेय 'सेक्रेड गेम्स 2' निमित्ताने आजवर कधीही न पाहिलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अमेयच्या चाहत्यांना 'सेक्रेड गेम्स 2' ची उत्सुकता आहे. 

 

Recommended

Loading...
Share