'व्हॅक्युम क्लीनर'च्या टीमतर्फे पूरग्रस्तांसाठी 3 लाख रुपयांची मदत

By  
on  

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक सामाजिक संस्थांपासुन ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी यात पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जण आपल्याला जमेल तसा खारीचा वाटा पूरग्रस्तांसाठी देत आहे. मराठी नाटक क्षेत्रातील सुद्धा अनेक मंडळी यासाठी पुढे सरसावली आहेत. 

नुकतंच रंगभुमीवर सध्या गाजत असलेल्या 'व्हॅक्युम क्लीनर' नाटकाच्या चमुने पूरग्रस्तांसाठी आपल्या विशेष प्रयोगातुन तीन लाख रुपये गोळा केले. ही मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करताना नाटकातील प्रमुख कलाकार अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकाचा संपुर्ण चमु यावेळी उपस्थित होता.

 

'व्हॅक्युम क्लीनर'टीमने पूरग्रस्तांसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल नाटकाच्या संपुर्ण टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

Recommended

Loading...
Share