स्मिता गोंदकर देत आहे परफेक्ट Vacation goals, ऑस्ट्रियात करतेय सुट्टया एन्जॉय

By  
on  

पप्पी दे पारुला’ म्हणत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिताची ओळख केवळ या गाण्यापुरतीच नाही. स्मिताने बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही स्वत:ची खास अशी ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे स्मिताचं नाव घराघरात पोहोचलं. स्मिता वरचेवर तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

अलीकडेच तिच्या स्विमवेअरमधील फोटोवर नेटिझन्सनी लाईक्सचा वर्षाव केला होता. सध्या स्मिता ऑस्ट्रीयामध्ये आहे. तिने ऑस्ट्रीयातील निसर्गरम्य लोकेशनवरील तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 

स्मिता अलीकडेच ‘येरे येरे पैसा 2’ मध्ये दिसली होती. यातील तिच्या ग्लॅमरस लूकचं सर्वत्र  कौतुक झालं होतं. स्मिता आता लवकरच आगामी ‘गडबड गोंधळ’ सिनेमात झळकणार आहे. यात तिच्यासोबत संतोष जुवेकर नायक साकारेल. त्यामुळे स्मिताच्या चाहत्यांना आता तिच्या आगामी सिनेमाचे वेध लागले आहेत.

 

Recommended

Loading...
Share