By  
on  

सैफसोबत काम करताना सहकलाकार म्हणून जागरूक राहावं लागतं: स्मिता तांबे

'सेक्रेड गेम्स 2' ने पहिल्या भागाप्रमाणे याही वेळी लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. गणेश गायतोंडे आणि सरताज सिंगच्या थरारक कहाणीने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या सिजनचं वैशिष्ट्य म्हणजे यात  अनेक मराठी कलाकारांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे. कमी स्क्रिनस्पेसमध्ये सुद्धा  स्मिताने आपल्या भूमिकेने सर्वांवर छाप पाडली. रमा या हॅकरच्या भूमिकेत असलेल्या स्मिताने प्रभावी अभिनय केला. बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानसोबत स्क्रीन शेयर केली. 

सैफ अली खानसोबत अभिनयाचा अनुभव कसा होता याविषयी स्मिताने  पिपिंगमुन मराठीशी खास बातचीत केली. स्मिता म्हणाली,''सैफ अली खान हा एक दिलखुलास माणूस आहे. तो जेव्हा सेटवर येतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो. तसेच तो एक अत्यंत उत्तम अभिनेता सुद्धा आहे. त्याच्यासोबत काम करताना एक सहकलाकार म्ह्णून जागरूक असावं लागतं. कारण तो कोणत्या क्षणाला कशी रिऍक्शन देईल हे ओळखणं खरंच कठीण आहे. परंतु त्याच्या या वैविध्यामुळे बॉलीवूडच्या या नावाबासोबत काम करणं मी मनापासून एन्जॉय केलं.'

सुपरहिट वेबसिरीज 'सेक्रेड गेम्स 2' १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये स्मिता तांबेसह अमृता सुभाष, सुहास शिरसाट, अमेय वाघ, नेहा शितोळे, गिरीश कुलकर्णी  हे मराठी कलाकार झळकत आहेत. तर यांच्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशीने काटेकर ही व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये नवाझुद्दिन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, कल्की, राधिका आपटे, नीरज कबी  यांची प्रमुख भूमिका आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive