By  
on  

'तो' फोटो पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री रेणुका शहाणेंना करावा लागतोय ट्रोलींगचा सामना

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या निखळ हास्याने आणि सुंदर अभिनयाने स्वतःची छाप सोडणा-या अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका शहाणे यांनी नुकतंच स्वतःच्या सोशल मिडीयावर पावसात अडकल्याचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमुळे आता रेणुका शहाणे यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

'रेणुका शहाणे तुमच्यासारख्या अभिनेत्रीला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला हे काही बरोबर नाही. तुम्ही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यायला सांगीतला पाहीजे. पावसाची तुम्हाला अडकवण्याची हिम्मत झालीक कशी??' अशाप्रकारचं ट्रोलिंग रेणुका यांना एका चाहतीने केलं आहे. 

 

 

याला रेणुका शहाणे यांनी 'मी तुझी माफी मागते की माझी विनोदबुद्धी तुझ्या पातळीची नव्हती' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे रेणुका शहाणे यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive