माणसाकडे प्रतिभा असेल तर त्याचा वापर कसा करावा हे ज्याचं त्याला ठाऊक. कोणी या प्रतिभेमार्फत नाविन्याचा आविष्कार करुन अद्भुत असं काम करुन जातं. अशाच काही प्रतिभासंपन्न लोकांमध्ये आशा भोसले यांचं नाव आदराने घ्यावं लागेल.
आशा भोसले या फक्त गायिका नव्हत्या. तर त्यांच्यामधल्या कलात्मक व्यक्तीने गायनाचे विविध प्रकार आत्मसात केले. भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावणी, कव्वाली, डिस्को, प्रेमगीत, गझल आदी गायनाच्या अनेक प्रकारांमध्ये आशा भोसले सहज वावरल्या.
सुरुवातीच्या काळात आशा भोसलेंनी भक्तिगीत, नाट्यगीत यांद्वारे कानसेनांना मंत्रमुग्ध केलं. आशा भोसले एवढ्यावरच समाधान मानणा-या नव्हत्या. त्यांनी पुढे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करुन ओ.पी.नय्यर आणि आर. डी. बर्मन यांच्यासोबत स्वतःची कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
स्वतःच्या गायनशैलीत आशाजींनी अनेक यशस्वी प्रयोग करुन दाखवले. त्या एका साच्यात अडकुन पडल्या नाहीत. आशाजींनी 'केव्हातरी पहाटे' सारखं हळुवार गीत तन्मयतेने गायलं तर त्याच आत्मीयतेने 'पिया तु अब तो आ जा' सारखं वेगळ्या धाटणीचं गाणं गायलं. 'इजाजत' सिनेमातील 'मेरा कुछ सामान' या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अशा या चिरतरुण, चतुरस्त्र आणि दिग्गज गायिकेला पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा