आज अभिनेता अतुल कुलकर्णीचा वाढदिवस आहे. अतुल त्याच्या अभिनयाबद्दल जितका ओळखला जातो तितकाच सामाजिक कार्याबाबतही ओळखला जातो. ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा सारख्या संस्थेतून अभिनयाचा श्री गणेशा केलेल्या अतुलने ‘हे राम’ आणि ‘चांदनी बार’ सारख्या सिनेमातून अभिनयाची छाप सोडली. त्यामुळेच त्याला या दोन्ही सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला.
अतुल कन्नड, हिंदी, तामिळा, तेलुगु, मराठी,इंग्रजी, मल्याळम, बंगाली या भाषांमधील सिनेमातही काम केलं आहे. ‘भेट’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘माती माय’, ‘नटरंग’, ‘सुखांत’, ‘हॅपी जर्नी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखांवर रसिकांनी मनापासून प्रेम केलं. याशिवाय त्याने ’सत्ता’, ‘दम’, ‘खाकी’, ‘पेज 3’, ‘रंग दे बसंती’, ‘कॉर्पोरेट’ यांसारख्या सिनेमांमध्येही भूमिकेची छाप सोडली.
अतुल आता वेब प्लॅटफॉर्मवरही आला आहे. ‘मायानगरी’ : सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये त्याने अमेयराव गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारली होती. अतुल एक संवेदनशील अभिनेता आहे. यशिवाय त्यानं समाजभानही जपलं आहे. तो शिक्षणातील मुलभूत संकल्पना अधिक उत्तम करण्यासाठी काम करत असलेला ‘क्वेस्ट’ या संस्थेशी तो जोडला गेला आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठीही त्याचा सतत पुढाकार राहिला आहे. अतुलला ‘पीपिंगमून मराठी’ कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा...