'मी खरंच आयुष्यात चांगलं काही केलंय म्हणून मला तु भेटलीस' सिद्धार्थ चांदेकरने मितालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

मराठी सिनेमांमधून आणि वेबसिरीजमधुन स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या मिताली मयेकरचा आज वाढदिवस आहे. मितालीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा होणारा भावी पती आणि मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरने मितालीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर मितालीचा फोटो पोस्ट करून त्याखाली खास अंदाजात मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

भाग्य आणि नशीब वगैरे वर माझा विश्वास नाहीये. मला कायम वाटतं की आपण काही वाईट केलं की आपल्याला वाईट मिळतं आणि आपण काही चांगलं केलं की आपल्याला खूप चांगलं मिळतं. मी खरंच काहीतरी फार चांगलं केलं असेन आयुष्यात म्हणून तुला भेटायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. आणि जर का ह्याला नशीब म्हणतात...तर मी बेहद्द खूष आहे माझ्या नशिबावर. Happy Birthday ️ Love. #tinypanda

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

'भाग्य आणि नशीब वगैरे वर माझा विश्वास नाहीये. मला कायम वाटतं की आपण काही वाईट केलं की आपल्याला वाईट मिळतं आणि आपण काही चांगलं केलं की आपल्याला खूप चांगलं मिळतं. मी खरंच काहीतरी फार चांगलं केलं असेन आयुष्यात म्हणून तुला भेटायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. आणि जर का ह्याला नशीब म्हणतात...तर मी बेहद्द खूष आहे माझ्या नशिबावर. Happy Birthday ️ Love #tinypanda' अशा प्रेमळ शब्दांमध्ये सिद्धार्थने मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I know right? First together️ #tinypanda #wanderlust

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिद्धार्थ आणि मिताली दोघांचाही या वर्षी साखरपुडा झाला. तसेच कोणत्याही इव्हेंटला हे दोघे एकत्र दिसतात. मितालीच्या वाढदिsiddharth वसाच्या या स्पेशल दिवशी सिद्धार्थ मितालीसाठी काय स्पेशल प्लॅन करतो याची सर्वांना उत्सुकता आहे. 

 

Recommended

Loading...
Share