By  
on  

पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत 'कलावंत पथक' प्रमुख आकर्षण

गणेशोत्सवात मिरवणुक ही ओघाने आलीच. हल्ली गणरायाचं आगमन आणि गणरायाचं विसर्जन या दोन महत्वाच्या प्रसंगी या मिरवणुकीचा थाट पाहायला मिळतो. यामध्ये महत्वाचं असतं ते म्हणजे ढोल-ताशा पथक. ढोल-ताशा पथकाचा ट्रेंड या मिरवणुकीत वाढत आहे. अनेक पथकं संपुर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. यातील एक महत्वाचं पथक म्हणजे मराठी सेलिब्रिटींचं 'कलावंत पथक'

मराठीतील काही सेलिब्रिटींनी 2014 साली एकत्र येऊन या कलावंत पथकाची सुरुवात केली. या पथकाची सुरुवात पुण्याला झाली. यंदाही पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरववणुकीत कलावंत पथकाचं ढोलवादन विशेष आकर्षण आहे. सकाळी १० वाजल्यापासून कलावंत पथकाने पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीसाठी वादन केले. 

यावर्षी सौरभ गोखले, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, आस्ताद काळे या कलाकारांनी या ढोलवादनात सहभाग घेतला होता. आपल्या आवडत्या कलाकारांना वेगळ्या रूपात बघून पुणेकर नक्कीच खुश झाले असतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive