आगामी आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये राधिका आपटे साकारणार ही भूमिका

By  
on  

राधिका आपटे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं नाव. वेबसिरीज, सिनेमा, शॉर्ट फिल्म आणि सिनेमांमधून राधिका आपटेने स्वतःच्या अभिनयाची छाप पडली आहे. आता राधिका अॅपलच्या नव्या सिरीजमध्ये झळकणार असून स्वतःच्या इंस्टाग्रामवर तिने एक पोस्ट शेयर करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली. 

'शांताराम' हे या सीरिजचे नाव असून ग्रेजोरी डेव्हिड रॉबर्ट्स यांच्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असणार आहे. रिचर्ड रॉक्सबर्ग आणि चार्ली हन्नम या हॉलिवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्यांसोबत राधिका झळकणार आहे. राधिका या वेबसीरिजमध्ये एका भारतीय पत्रकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

So excited to finally share this news!! #shantaram #kavita

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

'शांताराम'(Shantaram) या वेबसीरिजमध्ये एकूण दहा भाग असून ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये या वेबसीरिजचं शूटिंग होणार आहे. राधिका लवकरच 'द वेडिंग गेस्ट' आणि नवाझुद्दीन सिद्दीकी सोबत 'रात अकेली है' या दोन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share