वैदेही परशुरामी म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातील भूमिकेमुळे ती चर्चेत आली आहे. त्यातील तिच्या भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवा देखील तिने मिळवली. तर त्यानंतर लगेचच ती 'सिंबा' ह्या रोहीत शेट्टीच्या बॉलिवूड सिनेमात झळकली. तिची भूमिका एक शिक्षकेची असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून आलं. यात तिचा लुक साधा असला तरी छोटी परंतु लक्षवेधी भूमिका तिच्या वाट्याला आली आणि तिने सर्वांची मनं जिंकली.
नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असणारी वैदही आपले मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच वैदहीने एक फोटो शेअर केला आहे. तिनं त्याला कॅप्शनही सुरेख दिलं आहे. ती म्हणते," ही वेळ आहे काहीतरी नवीन सुरुवात करण्याची,मी ह्या जादूई सुरुवातीसाठी खुप उत्साही आहे." पण नेमकी कोणती सुरुवात हे मात्र वैदहीनं अद्याप तरी उलगडलेलं नाही. तेव्हा ती त्याची कधी घोषणा करते याची वाट पाहावी लागेल. पण तूर्तास तिच्या ह्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. इतकंच नव्हे तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही तिला ऑल द बेस्ट म्हटलं आहे.
आता वैदहीची ही नेमकी कसली सुरुवात आहे, हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.