स्वप्नील जोशीने जीवनसाथीला या खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

By  
on  

अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय. आपल्या उत्तमोत्तम सिनेमांमधून आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमधून त्याने चाहत्यांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. स्वप्नील जोशीच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक बाजू म्हणजे तो त्याच्या विविध पोस्ट मधून सोशल मीडियावर आपल्या बायकोसंबंधी प्रेम व्यक्त करत असतो. आज स्वप्नीलची बायको लीनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने स्वप्नीलने खास अंदाजात आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'एके दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस... त्यानंतर आजपर्यंत तू तुझ्या अस्तित्वाने आम्हा सर्वांना आनंद दिला आहेस... तुझं असणं आम्हा सर्वांसाठी सुखदायक... तुला खूप खूप प्रेम...'  अशा खास अंदाजात स्वप्नील जोशीने लीनाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

लीना आराध्ये ही स्वप्नीलची दुसरी पत्नी असून ती पेशाने डेंटिस्ट आहे. योगायोग म्हणजे स्वप्नीलची पहिली बायको सुद्धा डेंटिस्ट होती. लीना ही मूळची औरंगाबादची असून लीना आणि स्वप्नीलला मायरा आणि राघव ही दोन गोड मुलं आहेत. 

Recommended

Loading...
Share