अभिनेत्री श्रुती मराठे शाहरुख खानची निर्मिती असलेल्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसिरीजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत

By  
on  

शाहरुख खान निर्मित नेटफ्लिक्स वरील आगामी 'बार्ड ऑफ ब्लड' ची सर्वत्र चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये एक मराठी चेहरा सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. आपल्या सुंदर अदाकारीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी श्रुती 'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये झळकत आहे. 

श्रुतीची 'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये कोणती भूमिका साकारत आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार श्रुती एका मत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. श्रुतीने याआधी हिंदीमध्ये 'बुधिया सिंग-बॉर्न टू रन' या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत झळकली होती. 

 

शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' ची निर्मिती असलेल्या  'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये इम्रान हाश्मी, विनीत कुमार सिंग, शिशिर शर्मा, दानिश हुसेन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सात भागांची असलेली हि वेबसिरीज आजपासून नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

Loading...
Share