प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप, दाखल झाली एफआयआर

By  
on  

गेले काही दिवस बॉलिवूडमध्ये मी टू चं  वादळ पुन्हा घोंघावू लागलं आहे. यात केंद्रस्थानी आहे तो, प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने अनुरागवर लैगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर मंगळवारी रात्री  सिनेनिर्माता-दिग्दर्शक अनुरागविरोधात महिलेचं लैगिंक शोषण केल्याचा गुन्हा वर्सोवा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. 

या पीडीत अभिनेत्रीने आणि तिचे वकील एड. नितीन सातपुते यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. या प्रकरणाबद्दल बोलताना वकील नितीन सातपुते म्हणतात, माझे अशील या प्रकरणाबद्दल प्रथम वाच्यता करण्यास प्रचंड घाबरत होते. यातील पुरावे नष्ट होण्याची सर्वात जास्त भीती त्यांना होती. तसंच त्यांना या गुन्ह्याच्या दिवसाची तारीख लक्षात नसली तरी इतर सर्व बाबी व्यवस्थित लक्षात आहेत.

एड. सातपुते यांच्यानुसार त्यांनी त्यांच्या अशिलाने दिलेले सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्त केले आहेत, आता पुढील तपास पोलिस योग्य रितीने करतील व लवकरच अनुरागला अटक होईल अशी आशासुध्दा त्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, अनुराग कश्यपने माझ्यासोबत असभ्य आणि गैरवर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली गेली होती. असं पिडीत अभिनेत्रीने म्हटलंय  पण अनुरागने मात्र तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Recommended

Loading...
Share