By  
on  

पाहा Photos : हे आहे सोनाली कुलकर्णी आणि फियान्से कुणालच्या केमिस्ट्रीचं रहस्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर हे सध्या चर्चेत असलेलं कपल आहे. सोनालीने याच वर्षी तिचा साखरपुडा झाल्याची बातमी देत सोशल मिडीयावर सगळ्यांनाच कुणालसोबतच्या रिलेशनची गुड न्यूज दिली. त्यानंतर सोनाली आणि कुणालची जोडी सोशल मिडीयावरही चर्चेत आहे.

नुकतच सोनालीने कुणालसोबतचे काही थ्रोबॅक फोटो शेयर केले आहेत. सिनेमागृहे सुरु झाल्यानंतर 'हिरकणी' हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होत आहे. याच सिनेमाच्या खास आठवणी सध्या सोनाली शेयर करत आहे. या सिनेमाच्या प्रिमीयरचे कुणालसोबतचे काही खास क्षण तिने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. एवढच नाही तर त्यांच्या केमिस्ट्रीचं रहस्यही ती या पोस्टमध्ये सांगते.

पहिल्या फोटोत सोनाली फेक कॅंडीड देण्याचा प्रयत्न करते. मग कुणाल म्हणतो फेक कॅंडीड कशाला ? मग सोनाली आणि कुणाल पोझ करतात. या तिन्ही गोष्टी होत असताना या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसतेय. 

Recommended

PeepingMoon Exclusive