By  
on  

#माझी_झिम्मा_ट्रिप ची सोशल मिडीयावर चर्चा, कलाकारांनी शेयर केल्या 'झिम्मा' ट्रीपच्या आठवणी

'झिम्मा' या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. इतके उत्तम कलाकार एकाच सिनेमात असणार म्हटल्यावर धमाल येणारच. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी चर्चा सुरु आहे. यातच आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक नवा ट्रेंड सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. या सिनेमातील कलाकार आणि इतर सेलिब्रिटी सध्या  #माझी_झिम्मा_ट्रिप चा वापर करून त्यांच्या आठवणीतल्या ट्रीपचा फोटो शेयर करुन त्यांची झिम्मा ट्रीप आठवण शेयर करताना दिसत आहेत. झिम्मा सिनेमातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सिनेमाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या झिम्मा आठवणी शेयर केल्या आहेत.

तर अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक जुनी आठवण शेयर केली आहे. युकेमध्ये शिक्षण घेत असतानाचा एक जुना फोटो त्याने शेयर केला आहे. या फोटोत अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी देखील पाहायला मिळत आहेत. हेमंत लिहीतो की, "मी UK ला शिकत असताना नाटकाच्या प्रयोगांसाठी अमेय आणि निपुण तिथे आले होते... तेव्हा मी सुद्धा त्यांच्यासोबत पहिल्यांदा UK बघत होतो... माझ्या या सग्गळ्या मित्रांसोबतची #माझी_झिम्मा_ट्रिप सगळ्यात शेवटचा मी आहे!"

 

तर या ट्रेंडमध्ये एकमेकांना टॅग करून नॉमिनेट केलं जातय. ज्यात नॉमिनेट झालेल्या अभिनेत्री क्रांति रेडकर आणि क्षिति जोग यांनीही त्यांच्या जुन्या ट्रीपच्या आठवणी शेयर केल्या आहेत. 

 

येत्या 23 एप्रिल रोजी झिम्मा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kshitee jog (@kshiteejog)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive