By  
on  

स्त्री सिनेमाचा फर्स्ट लूक, रोमॅंण्टीक अंदाजात दिसले श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव

श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांचा पहिला सिनेमा ‘स्‍त्री’ चा फर्स्ट लूक नुकताच समोर आला. यात दोघंसुध्दा रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळत आहेत. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा लवकरच प्रदर्शित होत आहे.

‘स्त्री’चं पोस्टर शेअर करत राजकुमार रावने म्हटलं आहे, “स्त्रीपासून वाचण्यासाठी आम्ही तयारीत येतोय, तुम्हीसुध्दा सावधान राहा.” पोस्टर पाहून असं दिसतंय, एखाद्या अंधा-या रात्री हे नायक-नायिका एकमेकांना भेटतायत. तसंच महत्त्वाचं म्हणजे पोस्टरच्या पार्श्वभूमीवर चंद्राचे मोठे चित्र असून त्यात एका पदर घेतलेल्या स्त्रीचं प्रतिबिंब दिसतंय. काहीतरी गूढ कथानक असल्याची माहिती यावरून मिळतेय.

तर श्रध्दा कपूरने या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ट्विट केले आहे, “यावेळेस स्त्रीला नाही तर, देशाच्या प्रत्येक पुरूषाला तिच्यापासून धोका आहे. ती येतेय तुमच्या सर्वांना भेटायला.”

‘स्त्री’ सिनेमात राजकुमार आणि श्रध्दा बरोबरच पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि विजय राज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अमर कौशिक यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा भयपट असल्याचे समजतेय. भोपाळ, मध्यप्रदेशच्या चंदेरी या एका छोट्याशा गावात शूटींग करण्यात आली आहे. दिनेश विजन आणि मडॉक फिल्मसने सिनेमाची निर्मिती केली आहे.

येत्या 31 ऑगस्टला स्त्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive