International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योगदिनी या अभिनेत्रींनी केली योगाची विविध आसनं

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा हे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे कलाकार योगाला प्रधान्य देताना दिसतात. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटींनी योगाची विविध आसनांमधील त्यांचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तम आरोग्यासाठी योगाला प्राधान्य देतेय. सध्या अमृता तिची योग ट्रेनर रसिकासोबत योगाच्या नव्या प्रवासावर आहे. अमृताने तिच्या ट्रेनरसोबतचा योगासन करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. एवढच नाही तर काही कठीण वाटणाऱ्या आसनांमधील फोटो देखील शेयर केले आहेत. 

अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतीच योगा शिकण्यास सुरुवात केली आहे. हेमांगीने ऑनलाईन योगा शिकतानाचे तिचे फोटो शेयर केले आहे. फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी नाही तर स्टॅमिना, ताकद, लवचिकपणा वाढवण्यासाठी योग शिकत असल्याचं हेमांगी सांगतेय.

अभिनेत्री ईशा केसकरनेही तिचे काही योगा आसनांमधील फोटो पोस्ट केले आहेत. "योगाचा प्रवास हा स्वत:कडून, स्वत:च्या माध्यमातून स्वत:पर्यंतचा आहे" असं ती या पोस्टमध्ये लिहीतेय.

अभिनेत्री सोनाली खरेला योगाची आवड निर्माण झाली ती पति बिजय आनंद यांच्याकडून. अनेक वर्षांपासून सोनाली योगा करतेय. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सोनालीनेही योग आसनातील फोटो शेयर केला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील मागील काही वर्षांपासून योगा करतेय. योग दिनाच्या निमित्ताने सोनालीने योग आसन करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत सोनाली चक्रासन ते हलासन करताना दिसतेय.  

सोशल मिडीयावर विविध हटके फोटोंसाठी प्रसिद्ध असलेली नृत्यांगना अभिनेत्री कृतिका गायकवाडनेही योग दिनाच्या निमित्ताने विविध आसनांमधील काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

अभिनेत्री माधवी निमकरची तिचा फिटनेस ही देखील खास ओळख आहे. तिचा हा फिटनेस आहे तो योगामुळे. माधवीच्या आयुष्यातही योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगदिनाच्या निमित्ताने माधवीनेही विविध आसनांमधील फोटो शेयर केले आहेत.

Recommended

Loading...
Share