पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि फॅमिलीचा पोल्का डॉट मॅचिंग लुक

By  
on  

मराठी आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता गश्मीर महाजनीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनय, फिटनेस आणि लुक्समुळे गश्मीर हा प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतो. सोशल मिडीयावरही त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी गश्मीर सोशल मिडीयावर विविध पोस्ट करतो.

गश्मीरचे त्याचा मुलगा व्योम सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात. असेच काही फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

गश्मीरने नुकतच त्याचा मुलगा आणि पत्नीसोबतचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये तिघांनी सारख्या स्टाईलचे कपडे परिधान केले आहेत. पोल्का डॉट्स फॅशन सध्या ट्रेडिंग आहे. आणि याच फॅशनला फॉलो करत गश्मीर त्याचा मुलगा आणि पत्नीने ब्लॅक एन्ड व्हाईट पोल्का डॉट्स फॅशनचे कपडे घातले आहेत. गश्मीर महाजनी आणि परिवाराचा हे फोटो सोशल मिडीयावर पसंत केले जात आहेत.

Recommended

Loading...
Share