By  
on  

सोनाली बेंद्रे मुलाच्या वाढदिवसाला नाही त्याच्यासोबत; भावूक होऊन दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. सध्या न्यूयॉर्क येथे ती उपचार घेत आहे.इथे तिचा मुलगा रणवीर बहल नसल्याने तिला त्याची प्रचंड आठवण येत आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा वाढदिवस आहे.

सोनालीने रणवीरला वाढदिवसानिमित्त सोशल मिडीया अकाउंटवरुन शुभेच्छा दिल्या. अत्यंत भावूक होत सोनाली लिहीते, “ रणवीर माझा मुलगा. माझा लाडला. माझं सर्वस्व...असो ठिक आहे. जरा जास्त होत असलं, तरी मला ते म्हणण्याचा हक्क आहे. आज तुझा 13 वा वाढदिवस...छान! आता तु टिनएजर झाला आहेस. तुझी मस्ती, हुशारी, तुझा द्याळूपणा, तुझी ताकद यासर्वांसाठीच मला तुझा खुप अभिमान आहे. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! तुला भरपूर प्रेम आणि खुप मोठी मिठी!”

https://www.instagram.com/p/BmUz5ALFUAs/?taken-by=iamsonalibendre

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेद्रेंने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची बातमी 4 जुलै, 2018 रोजी दिली होती. पण ही बातमी आपल्या मुलाला कशी सांगायची याची चिंता सोनालीला सारखी सतावत होती. सोनाली आणि पती गोल्डी बहल यांच्यासमोर आपला मुलगा रणवीरला हे कसं सांगायचं, आणि तो यावर कशी प्रतिक्रिया देईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण दोघंही आई-बाबांनी मोठ्या धीराने ही परिस्थिती सावरुन घेतली.

सोनाली याआधी टीव्ही शो ‘इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज’ कार्यक्रमाच्या परीक्षकपदाची धुरा सांभाळत होती.1994 मध्ये सोनाली बेंद्रेने ‘आग’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सोनालीच्या कॅन्सरच्या बातमीने बॉलिवूडसह तिचा संपूर्ण चाहता वर्ग हळहळला. परंतु सोनाली मात्र या कठिण प्रसंगाला धैर्याने सामोरी जाताना पाहायला मिळते आहे. सोनालीच्या या धैर्याला बॉलिवूडसोबतच तमाम चाहत्यांचा त्रिवार सलाम. ती लवकरच या कठीण प्रसंगून बाहेर पडेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive